Active Learners धडपड, शिकाऊ उमेदवार
धडपड , शिकाऊ उमेदवार पिअजे , ह्या स्विस मानस तज्ज्ञाने 1960 नंतर शिक्षण क्षेत्रात मोठीच क्रांती घडवून आणली. त्या आधी मुलं म्हणजे फक्त लहान आकाराची माणसे असा समज होता. किंवा मुलं म्हणजे रिकामी भांडी आणि त्यात प्रथम आईवडिलांनी आणि नंतर शिक्षकांनी ज्ञानामृत ओतायचे असते. पिअजेने हे दोन्ही भ्रम सपशेल खोटे ठरवले. त्यांनी सांगितलं की कुणीतरी आपल्याला शिकवावं , मुलं ह्याची वाट पहात थांबत नाहीत. ती कोलंबस प्रमाणे स्वतःच जगाचा शोध घ्यायला निघालेली असतात. त्यांच्यासाठी शिकणं म्हणजे प्रत्येक नव्या गोष्टीला , वस्तूला , घटनेला प्रतिसाद देणे. आणि ते तर ह्या जगात नुकतेच आलेले असतात , त्यामुळे कुतूहल आणि उत्सुकता तर त्यांच्यात ओतप्रोत भरलेले असतात. ह्या दोन गुणांच्या आधारेच त्यांचा ' जगाचा शोध ' अव्याहत सुरू असतो. "दोन मिनीट दुर्लक्ष करता येत नाही" हे मुलांना सांभाळणाऱ्याचं होतं , ते त्यामुळेच. आता हे तत्व लक्षात ठेवूनच आपण मुलांची बौद्धिक वाढ कसकशी होत जाते , ते बघुयात. पहिली पायरी , शून्य ते दोन वर्षे वय. ह्या कोलंबसाकडची आयुधे तशी मर्यादित असतात. चोखणे आ...