Posts

Maria Montessori's children मारिया माॉन्टेसरीची मुले

  मारिया माॉ न्टेसरीची मुले मारिया माॉ न्टेसरीची मुले , अर्थात वय वर्षे दोन ते सात     आपल्या कोलंबसाच्या वाढीचा पुढला टप्पा.... या टप्प्यात आपलं बाळ छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी झालेले असते. त्याला पाय फुटलेले असतात. आणि खुर्ची किंवा लहान स्टूल सरकवून , त्याच्यावर चढून उचकपाचक करण्याची नवी कला आलेली असते. आता घरच्या लोकांना घरातल्या वस्तूंची फेररचना करायला लागते. अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे भाषेची उपलब्धी. जात्याच अंगात असलेले कुतूहल आणि उत्सुकता आता प्रश्नांच्या स्वरूपात बाहेर येते. प्रत्येक गोष्टीत का ? कशासाठी ? अशा प्रश्नांनी समोरच्याला भंडावून सोडले जाते. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना प्रतिकात्मकता समजायला लागते. उदाहरणार्थ हात पसरून विमान बनून घरभर आवाज काढत पळणारा मुलगा किंवा आपल्या भातुकलीच्या कपातून बाबाला चहा पाजणारी मुलगी. ह्याच काळात मुले नकला पण खूप करतात. आजोबा कसे चालतात , आई कशी फोनवर बोलते वगैरे. त्यांना ह्या वयात चित्र काढायला पण खूप आवडतात. तुम्हाला ते चित्र समजलं नाही तरी त्यांच्या डोक्यात काहीतरी जोरदार शिजत असतं. तुम्ही विचाराल तर...

Linguists भाषाकोविद

  भाषाकोविद   सर्वच मुलं जन्मतःच भाषातज्ञ असतात . हे वाक्य वाचून दचकलात ? मला सांगा , जगातल्या सात हजार भाषांमधली आपल्या वाट्याला आलेली कुठलीही भाषा मुलं किती सहजपणे शिकतात . ना त्यांना कोणी बाराखडी शिकवतं , ना व्याकरण , तरिही ते सहज शिकतात .   खूप वर्ष यावर काम केल्यावर शास्त्रज्ञांना लक्षात आलंय की मुलांची भाषा ग्रहण करण्याची पद्धत ही मोठ्या माणसांपेक्षा वेगळी असते . ही क्षमता सहाव्या - सातव्या वर्षापर्यंत टिकून राहाते . आणि ह्या काळात मुलांचा अजून एखाद्या नवीन भाषेशी संपर्क आला , तर हा काळ वाढतो . मुलं मग तीही भाषा त्यांच्या विशेष पद्धतीनेच शिकतात .   तिसऱ्या महिन्यांत दृष्टी धरायला लागलेलं बाळ , त्याला सांभाळणाऱ्याच्या नजरेला नजर मिळवून हुंकार द्यायला लागतं . तोंडाने फुर्र करून , हसून निरनिराळे आवाज काढायला लागतं . पाचव्या महिन्यांत स्वर व्यंजनाची जोडी जमवायला लागतं . जस की , बाबा , काका , मामा . आपल्या हावभावांचा उपयोग करायला लागतं . जसं की , हात पुढे कर...