Explaining Adoption Through Tales गोष्टी रूपातून दत्तक संकल्पना
गोष्टी रूपातून दत्तक संकल्पना दत्तक घेतलेल्या बालकाला दत्तक असल्याचं कसं सांगणार हा गहन प्रश्न अनेकदा पालकांच्या मनात असतो. असं सांगितल्या जातं की गोष्टीतून हा दत्तक शब्द आणि त्याचा भावार्थ मुलांपर्यंत पोचवावा. तरीही एक प्रश्न कायम राहतो की कोणत्या पद्धतीने पोचवावा ? उत्तर सोपं आहे. त्या त्या वयानुसार मुलांना रुचेल , समजेल अशा भाषेत ही गोष्ट सांगावी. अनेकदा काही गोष्टी आपल्याला जशा माहीत आहेत तश्याच्या तशा नाही सांगता येत. पण शेवटी ती गोष्ट म्हणून सांगणार तर थोडेफार बदल करून सांगितली तर मुलांपर्यंत ती छान पोचते. आता सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना जर सीतेची गोष्ट सांगायची झाली तर कशी सांगावी ? ' एक नगर होतं. त्याचं नाव मिथिला. एकदा काय झालं , एक शेतकरी अगदी पहाटेच काम करण्यासाठी आपल्या शेतात गेला. नांगराला फाळ लावून आणि बैलांना जुंपून तो शेतजमीन नांगरू लागला. भलं मोठ्ठ शेत होतं त्याचं. नांगरता नांगरता त्याला अचानक दूर काहीतरी पडलेलं दिसलं. त्यानी काम थांबवलं आणि जवळ जाऊन बघितलं तर एक झाकलेलं टोपलं तिथे पडलं होतं. त्यानी हळूच ते पातळ कापड बाजूस सारून पाहिलं , तर काय , दोन काळेभ...