Posts

Showing posts from November, 2024

वाट बघतांना

 वाट बघतांना...... अगदी लहानपणापासून वाट बघण्याची प्रक्रिया आपल्या आयुष्याचाच भाग असतो. छोटेपणी वाट बघायचो ती खेळण्याची, सणावारांची, कधी सुट्टीची तर कधी वाढदिवसाची... जसजसं वय वाढतं तशी वाट बघण्याची कारणं बदलत जातात तरुणपणात आपल्या प्रिय व्यक्तिची, मित्र मैत्रीणीची वाट बघणे सहजच होतं.  एक मात्र खर की हे ' वाट बघणं ' दरवेळेस त्रासदायक असतच असं नाही. जेव्हा ही प्रतिक्षा अनिश्चित असते, uncertainty ची भावना निर्माण करते, त्यावेळेस मात्र stress, तणाव निर्माण होतो.  Psychology, मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार हा तणाव, stress दोन प्रकारचा असतो.  * USTRESS * DISTRESS   यापैकी USTRESS हा काहीसा हवाहवासा वाटतो. कारण त्या तणावातही काहीतरी उद्दिष्ट असतं ज्यासाठी वाट बघायला आपण उद्द्युक्त Motivate होतो. उदाहरणार्थ, प्रिय व्यक्तिची प्रतिक्षा करतांना आलेला तणाव exciting असू शकतो. सुट्टीची वाट बघणे पण motivational असू शकतं.  मग DISTRESS कधी असतो? वाट पाहण्याच्या प्रक्रियेत जर आपलं मन अजाणताच शंकीत झालं, अस्वस्थ झालं तर हा  USTRESS - DISTRESS होतो. आणि मग या शंकीत मन...

MANTHAN

 मंथन म्हणजे नेमके काय?  शास्त्रीय परिभाषेत  "अभ्यासातून, विचार प्रक्रियेतून जे प्रतिबिंबित होते, ते मंथन".  बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयाबरोबरच मंथन अपरिहार्यपणे आलेच. असंख्य विचार, अनेक शंका कुशंकांची जळमटं आणि अपरिमित मानसिक आंदोलनं असतात डोक्यात. कधी कधी वाट हरवल्यागत वाटतं! ही वाट शोधण्याची, शंकांचं समाधानकारक निराकरण करण्याची आणि मानसिक आंदोलनं शांत करण्याची गतिविधी म्हणजेच मंथन! साकार संस्था गेली तीन दशके दत्तकपूर्व आणि दत्तक पालकांबरोबर काम करते आहे. या संपूर्ण प्रवासात झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीचा खूप सारा अनुभव गाठीस बांधून हा मंथनचा उपक्रम सुरू करत आहोत.  गेल्या काही वर्षांत दत्तक क्षेत्रात, सामाजिक, मानसिक स्तरावर तसेच दत्तक प्रक्रियेत प्रचंड बदल झाले आहेत, खूप मोठी उलथापालथ झाली आहे. पूर्वी पालकांबरोबर प्रत्यक्ष मुलाखतीतून, तसेच सखोल चर्चा व समुपदेशन सत्रांद्वारे परस्पर संवाद अनिवार्यपणे होत असे. आता मात्र दत्तक प्रक्रियेचे स्वरूप आमूलाग्र बदलल्यामुळे हे संभव होत नाही.  म्हणूनच ON LINE प्रणालीद्वारे तुम्हा सर्वांशी थेट संवाद साधणे हाच मंथन प्र...