वाट बघतांना
वाट बघतांना......
अगदी लहानपणापासून वाट बघण्याची प्रक्रिया आपल्या आयुष्याचाच भाग असतो. छोटेपणी वाट बघायचो ती खेळण्याची, सणावारांची, कधी सुट्टीची तर कधी वाढदिवसाची...
जसजसं वय वाढतं तशी वाट बघण्याची कारणं बदलत जातात तरुणपणात आपल्या प्रिय व्यक्तिची, मित्र मैत्रीणीची वाट बघणे सहजच होतं.
एक मात्र खर की हे ' वाट बघणं ' दरवेळेस त्रासदायक असतच असं नाही. जेव्हा ही प्रतिक्षा अनिश्चित असते, uncertainty ची भावना निर्माण करते, त्यावेळेस मात्र stress, तणाव निर्माण होतो.
Psychology, मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार हा तणाव, stress दोन प्रकारचा असतो.
* USTRESS
* DISTRESS
यापैकी USTRESS हा काहीसा हवाहवासा वाटतो. कारण त्या तणावातही काहीतरी उद्दिष्ट असतं ज्यासाठी वाट बघायला आपण उद्द्युक्त Motivate होतो. उदाहरणार्थ, प्रिय व्यक्तिची प्रतिक्षा करतांना आलेला तणाव exciting असू शकतो. सुट्टीची वाट बघणे पण motivational असू शकतं.
मग DISTRESS कधी असतो?
वाट पाहण्याच्या प्रक्रियेत जर आपलं मन अजाणताच शंकीत झालं, अस्वस्थ झालं तर हा USTRESS - DISTRESS होतो. आणि मग या शंकीत मनातील वर्तुळ नकारात्मक विचारांमुळे गडद काळं होऊ लागतं. आणि बघता बघता ही काळी सावली आपल्याला पूर्णपणे घेरते, गुरफटून टाकते. वाट पाहणं असह्य होऊ लागतं.. सर्व काही नकोसं वाटू लागतं.. ही नकोशी भावना, अनिश्चितता थोडी तरी सुसह्य होईल यासाठी काय बर करता येईल?
POWER OF DISCRIMINATION
( सारासार विवेक)
What is in our control
& what is not?
जेव्हा या दोन्हीत discriminate, करता येत नाही, यातला फरक लक्षात येत नाही, तेव्हाच परिस्थिती त्रासदायक होते.
आपल्या आयुष्यात सर्वच गोष्टी आपल्या control मधे असतात असं नाही नं!
म्हणूनच ही discrimination ची सारासार विवेक पद्धती जाणून घेणं गरजेचं आहे.
EXTERNAL FACTORS CAN'T BE CONTROLLED
Adoption च्या प्रक्रियेत
*CARA Procedure
*Wait list number
*येणाऱ्या बालकाची पार्श्वभूमी
*त्याचा चेहरा मोहरा
*Adopted असल्याचं समजल्यावर बालकाचा प्रतिसाद
हे सर्व ठरवणं आपल्या control च्या बाहेर आहे.
आपला समाज, आपले कुटुंब Adoption च्या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतील ते आपण ठरवू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे तशी स्वीकारून फक्त ती सुसह्य कशी होईल हे बघणं तर आपल्याच हातात आहे नं!!!
उदाहरणार्थ, आज उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि बाहेर तर जायलाच हवं आहे, या गोष्टीचा त्रास करून घेणं कितपत बरोबर आहे? डोक्यावर छत्री घेऊन ही झळ आपण कमी तर करूच शकतो नं!!
ह्या external factorsना स्वीकारून त्यांचा सामना करून ते सोपं होईल यासाठी काय बरं करता येईल?
यासाठी INTERNAL FACTORS म्हणजेच
1] My self control - मनावर ताबा
2] Daily routine - दिनचर्या
3] Engagement- कार्यमग्न राहणे
4] Assertive communication with partner - साथीदारासह सुसंवाद
5] less blame game- दुसर्यावर दोषारोप नं करणे
हे पाच गुण आत्मसात करण्यासाठी सारासार विवेक असणं, विचारांचं प्रयत्नपूर्वक नियोजन करणं अत्यंत जरूरी आहे. येणाऱ्या बालकाचे सुजाण पालक बनायचे असेल; तर विचारांचं वर्तुळ काळं करणाऱ्या व्यक्ती किंवा गोष्टींच्या प्रभावापासून सावध राहणे, self doubts निर्माण करणाऱ्या external factors ना filter करणे, चाळणी लावणे, अशा प्रकारची POWER OF DISCRIMINATION अंगी बाणवली तर ही प्रतिक्षा नक्कीच सुसह्य होईल!!!
_____________________________________________________
The Period of Waiting...
From a very young age, waiting becomes an integral part of our lives. As children, we wait for toys, festivals, holidays, or birthdays.
As we grow older, the reasons for waiting change. In youth, waiting for a loved one or friends becomes a natural part of life.
One undeniable truth is that waiting is not always unpleasant. However, when waiting is for uncertain period, it often leads to stress and anxiety.
According to the principles of Psychology, stress can be of two types:
* USTRESS
* DISTRESS
USTRESS can be a positive experience as it is often associated with a goal that motivates us to wait. For example, the excitement of waiting for a loved one or anticipating a holiday can be stimulating and fulfilling.
But when does DISTRESS occur?
If the waiting process triggers self doubts or restlessness in the mind, USTRESS can turn into DISTRESS. The mind, clouded by uncertainty, begins to spiral into negative thoughts, forming a dark shadow that envelops us. Waiting then becomes unbearable, and everything becomes unbearable.
So, what can we do to make this uncertainty a bit more manageable?
THE POWER OF DISCRIMINATION
What is in our control and what is not :
The inability to distinguish between these two is what makes situations stressful. Not everything in life is within our control. Hence, it is essential to develop the skill of discrimination and discernment.
External Factors Cannot Be Controlled :
For instance, in the process of adoption,
* CARA procedures
* Waitlist numbers
* The background of the child
* The appearance of the child
* The child’s reaction upon learning they are adopted
These are all beyond our control.
Similarly, how society or family reacts to the decision of adoption is not something we can dictate. Accepting this reality and finding ways to ease the process is in our hands.
For example, if the sun is harsh today and you need to step outside, is it worth stressing over? Instead, you could carry an umbrella to shield yourself and make the situation more bearable!
By accepting external factors and finding ways to tackle them, we can simplify our experiences.
Internal Factors We Can Control :
To make waiting more manageable, focus on these internal factors:
1. Self-control – Gaining control over your mind.
2. Daily Routine – Maintaining a balanced schedule.
3. Engagement – Keeping yourself productively occupied.
4. Assertive Communication with Your Partner – Building mutual understanding.
5. Less Blame Game – Avoiding the habit of blaming others.
To imbibe these five qualities, it is essential to cultivate discrimination, plan your thoughts deliberately, and avoid influences that darken your mindset.
If you aspire to be responsible parents to the child you are waiting for, guard yourself against the negative impact of people or factors that create self-doubt. Filter out such negative influences and develop the Power of Discrimination.
With this approach, the waiting will undoubtedly become more bearable and manageable!
Comments
Post a Comment