Active Learners धडपड, शिकाऊ उमेदवार

 

धडपड, शिकाऊ उमेदवार 

 पिअजे, ह्या स्विस मानस तज्ज्ञाने 1960 नंतर शिक्षण क्षेत्रात मोठीच क्रांती घडवून आणली.

त्या आधी मुलं म्हणजे फक्त लहान आकाराची माणसे असा समज होता. किंवा मुलं म्हणजे रिकामी भांडी आणि त्यात प्रथम आईवडिलांनी आणि नंतर शिक्षकांनी ज्ञानामृत ओतायचे असते.

पिअजेने हे दोन्ही भ्रम सपशेल खोटे ठरवले. त्यांनी सांगितलं की कुणीतरी आपल्याला शिकवावं, मुलं ह्याची वाट पहात थांबत नाहीत. ती कोलंबस प्रमाणे स्वतःच जगाचा शोध घ्यायला निघालेली असतात. त्यांच्यासाठी शिकणं म्हणजे प्रत्येक नव्या गोष्टीला, वस्तूला, घटनेला प्रतिसाद देणे. आणि ते तर ह्या जगात नुकतेच आलेले असतात, त्यामुळे कुतूहल आणि उत्सुकता तर त्यांच्यात ओतप्रोत भरलेले असतात. ह्या दोन गुणांच्या आधारेच त्यांचा 'जगाचा शोध' अव्याहत सुरू असतो. "दोन मिनीट दुर्लक्ष करता येत नाही" हे मुलांना सांभाळणाऱ्याचं होतं, ते त्यामुळेच. 

आता हे तत्व लक्षात ठेवूनच आपण मुलांची बौद्धिक वाढ कसकशी होत जाते, ते बघुयात. 

पहिली पायरी, शून्य ते दोन वर्षे वय.

ह्या कोलंबसाकडची आयुधे तशी मर्यादित असतात. चोखणे आणि रडणे ह्या दोन प्रतिक्षिप्त क्रिया (reflexes) आणि पाच ज्ञानेंद्रिय. म्हणूनच वाढीच्या ह्या टप्प्याला sensory motor stage (संवेदना आणि हालचाल टप्पा) म्हणतात.

अर्थातच मग ह्या वयातली वाढ सुदृढ व्हावी, यासाठी त्यांच्या संवेदनांना चेतवणे आवश्यक ठरते. रस, रंग, वास, नाद आणि स्पर्श. पाळण्यावर लावलेलं चिमणाळं, त्याची रंगबेरंगी हालचाल बाळांच्या दृष्टीला चालना देतं. खुळखुळा आणि त्याचा मंजुळ नाद, बाळाच्या कानांना चेतवतो. जर तो धरायला दिला तर हालचालींना पण चालना मिळते. आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांचा कानोसा घेणे, हाती पडेल ते तोंडात घालून चाखून पहाणे, आई आजीची अंगाई ऐकणे, आजूबाजू ऐकू येणारे संगीत, सर्वच गोष्टी त्यांना चेतवत असतात. 

मऊ, मुलायम, खडबडीत, गुळगुळीत, खरखरीत, उबदार, थंडगार स्पर्श कितीक प्रकारचे असू शकतात. त्यांना सर्व स्पर्शांना नावं देणं अजून जमणार नाही. पण ते अनुभव ते आपल्या मेंदूत साठवून ठेवत असतात. 

या वयातल्या हालचाली म्हणजे पालथं पडणं, सरकणं, घोडा करणं, रांगणं, धरून उभं राहाणं, न धरता उभं राहाणं, न धरता चालणं आणि शेवटी दुडूदुडू पळणं. पण खरं सांगू, या कशालाच त्यांना मदत नको असते. पांगुळगाड्याची गरज नसते. त्यांच्यातली विजीगीषु वृत्ती पुरेशी असते.

या टप्प्याच्या शेवटी दोन महत्त्वाचे शोध बाळांना लागतात. एक म्हणजे कृती केली की परिणाम होतात. मग एखादी कृती ते परत परत करून बघतात. वरून खेळणं खाली टाकलं की कुणीतरी उचलून देतं. की पुन्हा खाली टाकणं. दुसरा शोध म्हणजे दृष्टिआड गेले तरी वस्तू आणि माणसे शाबूत असतात. 'बुवा कुक्' हा खेळ त्यातूनच येतो.

बौद्धिक वाढीचा पुढचा टप्पा पुढच्या ब्लॉग मधे बघूयात.

 

 

Active Learners 


Jean Piaget is the Swiss psychologist who revolutionised our concepts about education and learning after 1960.

Till that time children were regarded as little adults. They were considered vessels into which initially the parents and later the teachers have to pour knowledge. 

Both these assumptions were proved to be totally wrong by Piaget's experiments. 

According to him, children like Columbus are world explorers. For them learning is about reacting to every new thing or new experience. And as they themselves are new in this world, for them 'the whole world is their oyster'. They are full of eagerness and curiosity. These two qualities help them to continuously explore the world. 

"Can't leave him alone for a minute." People looking after the kids always complain. 

Let's keep these principles in mind, when we talk about the cognitive growth in children. 

First step is from zero to two years of age. 

This Columbus has limited instruments to explore the world. Just two reflexes, sucking and crying and five senses. That's why this developmental stage is called 'sensory motor stage'.

To encourage their growth one must arouse their five senses, taste, sight, smell, sound and touch. 

For example the colourful mobile over their cribs arouses their sight, the sound of rattle arouses their hearing. If you allow the baby to hold the rattle, that stimulates movements as well. Babies like to follow the people around them with their eyes. They like to shove everything in their mouths. Lullaby sung by mothers and grandmothers or music playing on the radio, all stimulate their hearing. 

Soft, coarse, smooth, abrasive, warm, cool. A touch can be of so many different varieties. Even though they can't name these experiences, they file them in their brains. 

On their own, they learn movements, from turning to crawling to standing with support, then walking with support and lastly walking and running. Frankly speaking, they don't need anybody's help. They don't need baby walkers. The innate desire is enough to propell them.

At the end of this stage, they have learnt that actions have consequences. E.g. the baby will throw a toy, someone will pick it up, the baby will again throw it down etc. 

Another important concept they have learnt is that of permanence of things and people. Though things and people move away from their eyesight, they are still there. 'Pickaboo' is the game developed from this understanding. 

We will talk about the next stage of cognitive development in our next blog.

Comments

Popular posts from this blog

Linguists भाषाकोविद

एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना Adopting a One-Year-Old Child