Maria Montessori's children मारिया माॉन्टेसरीची मुले
मारिया माॉ न्टेसरीची मुले मारिया माॉ न्टेसरीची मुले , अर्थात वय वर्षे दोन ते सात आपल्या कोलंबसाच्या वाढीचा पुढला टप्पा.... या टप्प्यात आपलं बाळ छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी झालेले असते. त्याला पाय फुटलेले असतात. आणि खुर्ची किंवा लहान स्टूल सरकवून , त्याच्यावर चढून उचकपाचक करण्याची नवी कला आलेली असते. आता घरच्या लोकांना घरातल्या वस्तूंची फेररचना करायला लागते. अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे भाषेची उपलब्धी. जात्याच अंगात असलेले कुतूहल आणि उत्सुकता आता प्रश्नांच्या स्वरूपात बाहेर येते. प्रत्येक गोष्टीत का ? कशासाठी ? अशा प्रश्नांनी समोरच्याला भंडावून सोडले जाते. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना प्रतिकात्मकता समजायला लागते. उदाहरणार्थ हात पसरून विमान बनून घरभर आवाज काढत पळणारा मुलगा किंवा आपल्या भातुकलीच्या कपातून बाबाला चहा पाजणारी मुलगी. ह्याच काळात मुले नकला पण खूप करतात. आजोबा कसे चालतात , आई कशी फोनवर बोलते वगैरे. त्यांना ह्या वयात चित्र काढायला पण खूप आवडतात. तुम्हाला ते चित्र समजलं नाही तरी त्यांच्या डोक्यात काहीतरी जोरदार शिजत असतं. तुम्ही विचाराल तर...