All the advice in the world will never help you until you help yourself
दत्तक विधान आणि त्याचे सामाजिक पैलू, या विषयावर मंथन होत असतांना एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आणि तो म्हणजे मूल दत्तक घेण्याच्या निर्णयावर आणि संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान एक सामाजिक दबाव असतो. नवदांपत्याच्या सभोवती असलेल्या नातलगांकडून तसेच इतर व्यक्तींकडून, नवविवाहित दांपत्याने मूल जन्माला घालावे अशी अपेक्षा व्यक्त होतेच आणि जसजशी विवाहानंतर वर्षे उलटू लागली की ही अपेक्षा अधिक धारदार बनू लागते. पुरूषांपेक्षा महिलांना ह्या अपेक्षांचा दबाव जास्त अनुभवावा लागतो. मीच कां? ह्या प्रश्नाचा उदय ह्या दबावातून येतो हे लक्षात घेतले पाहिजे. परंतू एकदा मीच कां? ह्या प्रश्नाचे स्वतःला समाधानकारक उत्तर मिळाले की पुढचा प्रवास सोयीचा होतो. परंतु अनेक पालक या प्रश्नाचे उत्तर ठामपणे मानसिक पातळीवर स्वीकारू शकत नाहीत त्यामुळे मूल दत्तक घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतरही आणि कुटुंबात मूल आल्यानंतरही त्यांचा लढा सुरूच राहतो. स्वतःचे जैविक मूल ( बायोलॉजिकल चाइल्ड)जन्माला न घालता येणाऱ्या पालकांना आपल्यात काही कमतरता आहे असंच आयुष्यभर वाटू शकतं. जैविक मूल जन्माला न घा...