मी का? Why Us?

 25 वर्ष होऊन गेली दत्तक पालकांबरोबर संवाद आणि चर्चा सुरू आहे! एवढ्या वर्षानंतर खूप काही बदललं आहे. दत्तक विधानाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन, कायदेशीर प्रक्रिया, दत्तक पालकांची मानसिकता, सगळ्यातच परिवर्तन झालं आहे. मात्र दत्तक घेण्यापूर्वी आणि घेतल्यावरही काही गोष्टी पिंगा घालत राहतात पालकांच्या मनात, हा आमचा अनुभव आहे. काही पालक उघडपणे हे विचार बोलून दाखवतात, तर काही मनातच ठेवतात. परंतू या विचारांचा झिम्मा सुरूच राहतो. आज असेच काही विषय समोर ठेवून आपण विचार करूया!

1. 'मीच' का? 'Why Me'
आपल्याला माहीत आहेच की प्रजनन ही सृष्टीतील नैसर्गिक प्रक्रिया आहे, मग ते पशू पक्षी असोत, वृक्षवल्ली असोत की मनुष्य असो! काही अपरिहार्य कारणास्तव कधी कधी माणसांमधे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होऊ शकत नाही. अशा वेळेस, मीच का, हा प्रश्न मनात दाटून येतो. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर शोधणं खूप आवश्यक आहे. कारण अशाच मनःस्थितीत आपण दत्तक घेण्यापूर्वी किंवा नंतर असू तर त्याचा विपरीत परिणाम आयुष्यावर होतो. यातून बाहेर पडणं खर तर आपल्याच हातात असतं. आपण आजूबाजूला बघितलं तर जाणवेल की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी कमतरता असतेच. सर्वार्थानी परिपूर्ण सुखी कोणीच असत नाहीत. जे नैसर्गिक पालक होऊ शकत नाहीत त्यांच्या आयुष्यात ही त्रुटी कायम राहणार आहे. ही बाब खुलेपणानी स्वीकारून तिला सामोरं जाणं हाच पर्याय असतो. आणि या परिस्थितीवर मात करण्याचा सुंदर विचार म्हणजेच दत्तक विधान! 
2. जन्मदाती
दुसरा अतिशय क्लेशदायक विचार असतो की हे बाळ कुण्या दुसर्‍याच आईच्या गर्भातून आलेलं आहे. विशेषकरून आईसाठी हा विचार मन कुरेदत राहतो. 
हा विचार का बरं इतका नकोसा वाटतो! हे मातृत्व आणि पितृत्व आपलं नैसर्गिक नाही म्हणून की काही वेगळाच किंतू असतो मनात! जैविक गुणसूत्रांचं baggage बाळ स्वतःबरोबर आणेल ही भिती वाटत असते का? काही प्रमाणात ते खर आहे. म्हणजे उंची, रंग, शरीरयष्टी इत्यादी बाह्यरूपे असू शकतात कदाचित गुणसूत्रांप्रमाणे. पण आपण असही बघतो की कधी कधी जैविक मुले देखील आईवडीलांपेक्षा वेगळीच असतात. पण हा मुद्दा खरच एवढा ऐरणीचा असतो का! मला वाटतं की आपण मुलांना कसं वाढवतो, काय संस्कार देतो हे अधिक महत्त्वाचं आहे. 

वरील दोन्ही प्रश्नांवर एक समान उत्तर आहे. आपण वास्तव पूर्णपणे स्वीकारणे. आपण हे वास्तव नाकारलं म्हणून ते नाहीसं तर होणार नाहीच उलट या विचारांच्या भोवर्‍यात आपण भेलकांडत राहतो. आहे ती परिस्थिती स्वीकारून पचवली तर आपण लगेच त्याची पर्यायी व्यवस्था करतो म्हणजेच action mode मधे येतो. 
कोणीतरी विचारलं की तुझा कप अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे? 
Somebody asked me, if my cup is half full or half empty? 
माझं उत्तर आहे, मी भाग्यवान आहे की माझ्याजवळ *कप आहे* 
My response is, I am thankful that I *have cup* 
कधी असाही विचार कराल तर आयुष्याचे गुंते सुटतील. 
आयुष्य आपल्याच मनासारखं 100% कसं असेल, पण हे माझं आयुष्य आहे आणि ते सुंदर बनवणं तर माझ्याच हातात आहे! आणि हे करताना एका बाळाचंही आयुष्य स्वतःबरोबर जोडून एक समृद्ध जीवन जगणं सहज सुलभ नाही का होणार!!


For the past 25 years, we have been engaged in dialogues and discussions with adoptive parents! Over the period, much has changed—the societal perspective towards adoption, legal processes, and the mindset of adoptive parents—all have undergone transformations. However, it is our  experience that certain thoughts continue to linger in the minds of parents, both before and after adoption.  Some parents openly express these thoughts, while others keep them to themselves. Yet, these thoughts persist. Today, let us reflect on some of these topics.

1. Why Me?

We all know that reproduction is a natural process in creation, whether it involves animals, birds, trees, or humans. However, due to unavoidable circumstances, this process may not occur naturally for some people. In such situations, the question "Why me?" often arises in the mind. It is essential to find a satisfying answer to this question. If we remain stuck in this mindset before or after adoption, it can have a negative impact on life.
Ultimately, overcoming this is in our own control. If we observe the world around us, we realize that everyone’s life has some or the other deficiency . No one is completely perfect or happy in every sense. For those who cannot become biological parents, this void may remain in their lives forever. Accepting this truth openly and facing it is the only option. And the beautiful thought of adoption is a wonderful way to overcome this situation.

2. The Birth Mother

There is another deeply distressing thought that the child has come from another mother's womb. This thought, especially for the adoptive mother, can be unsettling.
Why does this thought feel so discomforting? Is it because motherhood and fatherhood are not biological? Or is there some other hesitation? Is it the fear that the child may carry the "baggage" of genetic traits from the biological parents? To some extent, this might be true—attributes like height, skin color, and physique could be influenced by genetics. But we also see that sometimes biological children are quite different from their parents.
So, is this issue really as significant and crucial as it seems? In my opinion, how we raise children and the values we impart are far more important.

A Common Answer to Both these questions,
the common solution to these concerns is to fully accept the hard reality. Denying reality doesn’t make it disappear; instead, it keeps us stuck in a whirlpool of negative thoughts. Once we accept the situation and internalize it, we can immediately shift to action mode to make the best of it.

Someone once asked, “Is your cup half full or half empty?”
My answer was: “I am fortunate to have a cup in the first place!”

When we approach the issues this way, the complexities of life begin to unravel. Life may not always be 100% as per our desire, but after all it is our life, and making it beautiful is in our hands.

And while doing so, if we connect a child’s life with ours and live a rich and meaningful existence together, doesn’t that make life all the more fulfilling and beautiful?!!

Comments

Popular posts from this blog

Linguists भाषाकोविद

एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना Adopting a One-Year-Old Child

Active Learners धडपड, शिकाऊ उमेदवार