Posts

Showing posts from April, 2025

Tantrums त्रागा अर्थात टॅन्ट्रम

  त्रागा अर्थात टॅन्ट्रम   दुसरं वर्ष ओलांडून तिसरं लागलं की ह्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आता आपल्याला काय हवंय , काय नकोय , काय आवडतंय , काय नावडतंय आणि थोड्या प्रमाणात स्वतःच्या भावना हे समजायला लागतं. आपल्या हाताने सगळं करायचं असतं. पण ते न जमल्याने किंवा भावनांचे नियंत्रण न करता आल्यास मोठ्याने भोकाड पसरण्यात येते. हातपाय आपटणे , जमिनीवर लोळण घेणे , वस्तू फेकणे , आईबाबांना फटके मारणे , काही विचारू नका. आपल्या गोंडस बाळाचे हे रूप आईबाबांना घाबरवून सोडतं. हा असा कार्यक्रम बरेचदा बाहेर कुठे गेले असताना चारचौघात होतो. आणि त्यामुळे आईबाबांना कानकोंडं होऊन जातं. अशावेळेस प्रथम लक्षात ठेवायचं की आपण शांत राहायचं. आपण घाबरून बावचळून गेलो तर कार्यक्रम अजून वरच्या पट्टीत जाऊन प्रकरण हट्टीपणाकडे पोहोचतं. दुसरं म्हणजे असा तमाशा सर्वच मुलं करतात. त्यामुळे कानकोंडं न होता बाळाला जवळ घेऊन तिथून निघून जा. जेणेकरून ज्या कुठल्या घटनेमुळे , वस्तूमुळे ह्या त्राग्याची सुरुवात झाली होती , तिथून त्याचे लक्ष विचलित करता येईल.   लक्षात घ्या की त्यांचा त्रागा होतो कारण त्यांना काय ह...

Who am I? कोहम् ?

  कोहम् ?   मी कोण आहे ? हा एक मोठाच गहन प्रश्न आहे. मोठ्मोठ्या तत्ववेत्त्यांनी ह्याचा शोध घेतला आहे. पण ह्या प्रश्नाचे उत्तर माणूस अगदी जन्मापासून शोधत असतो. या शोधाचा (वाढीचा) पहिला टप्पा , जन्मापासून अठरा महिन्यांपर्यंतः   हा सुरवातीचा शोध बराचसा शारीरिक असतो. बाळाला शोध लागत असतो आपल्याच हातांचा , पायांचा. मधेच आपल्याच चेहऱ्याला बोचकारून कुठे काय आहे , ते चाचपणे सुरू असते.   ह्याच काळात एक प्रकारे मनोसामाजिक ( psychosocial) वाढ पण होत असते. आपली भूक भागवणारी ही आजूबाजूची माणसं , ' आपली ' माणसं आहेत. बोळकं पसरून बाळ हसतं.   वयाच्या या टप्प्यात जगाबद्दल भरवसा ( trust) तयार होत असतो. तो ' आशा ' ही महत्त्वाची भावना तयार करतो.   दुसरा टप्पा असतो अठरा ते तीस महिन्यांपर्यंतः त्यांना स्वतःच्या "मी" पणाची , आपल्याला आवडीनिवडी , भावना असण्याची जाणीव होते.   ह्या टप्प्याला मराठीत ' तिसरं निसरं ' तर इंग्रजीत ' टेरिबल टूज ' म्हणतात.   मुलांना पाय फुटलेले असतात आणि वेगवेगळी ' कामं ' करायची असतात. अर्थात ती जमतातच असं नाही. मग येतो...