Tantrums त्रागा अर्थात टॅन्ट्रम

 

त्रागा अर्थात टॅन्ट्रम 

दुसरं वर्ष ओलांडून तिसरं लागलं की ह्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आता आपल्याला काय हवंय, काय नकोय, काय आवडतंय, काय नावडतंय आणि थोड्या प्रमाणात स्वतःच्या भावना हे समजायला लागतं. आपल्या हाताने सगळं करायचं असतं. पण ते न जमल्याने किंवा भावनांचे नियंत्रण न करता आल्यास मोठ्याने भोकाड पसरण्यात येते. हातपाय आपटणे, जमिनीवर लोळण घेणे, वस्तू फेकणे, आईबाबांना फटके मारणे, काही विचारू नका. आपल्या गोंडस बाळाचे हे रूप आईबाबांना घाबरवून सोडतं. हा असा कार्यक्रम बरेचदा बाहेर कुठे गेले असताना चारचौघात होतो. आणि त्यामुळे आईबाबांना कानकोंडं होऊन जातं.

अशावेळेस प्रथम लक्षात ठेवायचं की आपण शांत राहायचं. आपण घाबरून बावचळून गेलो तर कार्यक्रम अजून वरच्या पट्टीत जाऊन प्रकरण हट्टीपणाकडे पोहोचतं.

दुसरं म्हणजे असा तमाशा सर्वच मुलं करतात. त्यामुळे कानकोंडं न होता बाळाला जवळ घेऊन तिथून निघून जा. जेणेकरून ज्या कुठल्या घटनेमुळे, वस्तूमुळे ह्या त्राग्याची सुरुवात झाली होती, तिथून त्याचे लक्ष विचलित करता येईल. 

लक्षात घ्या की त्यांचा त्रागा होतो कारण त्यांना काय हवंय, काय होतंय ते सांगायला जमत नसतं. ते ओळखण्याचा प्रयत्न करा. त्याला काय म्हणायचंय ते लक्ष देऊन ऐका. कधीकधी ते हातवार्यांनी पण बोलतात. तुला भूक लागलीय? झोप आलीय? ते खेळणं हवंय? बाहेर जायचंय? वगैरे... मग जे हवंय ते मिळणार नसेल तर का नाही, आणि त्याऐवजी काय मिळू शकेल ते सगळेच समजावून सांगा. त्यांच्या त्राग्याला घाबरून हट्ट पुरवत जाल तर एक हट्टी लाडावलेलं मूल वाढवाल.

अर्थात हे त्रागे घडू नयेत ह्याची खबरदारी घेणे अधिक योग्य. जसे की....

1. बाळाच्या भुकेच्या, झोपेच्या वेळा सांभाळणे. त्याचे रुटीन पाळले तर सर्वांनाच सोयीचे होते.

2. हे वय उचकाउचकी करायचे असते. त्यामुळे सहज हातास लागतील अशा जागी, बाळाच्या हातात पडू नयेत त्या वस्तू ठेवायच्या नाहीत. मग त्या काढून घ्यायची वेळ येत नाही. 

3. त्यांना सूचना देतांना प्रश्नार्थक किंवा नकारात्मक वाक्य न वापरता, सोपी छोटी होकारात्मक वाक्य वापरा. 'दार आपटू नकोस' ऐवजी 'दार हळूच बंद कर' 'खेळणी आवरायला जमेल का?' ऐवजी 'जमेल तेवढी खेळणी आवर'

4. जी ठिकाणं किंवा जी परिस्थिती हमखास त्रागा निर्माण करतात, त्याच्या आधीच स्पष्ट शब्दात सूचना द्या. 'आपण खेळण्यांच्या दुकानात जाणार आहोत कारण शेजारच्या बाळाला गिफ्ट घ्यायचंय. पण आज तुला खेळणं घेणार नाहीये.'

5. मुलांना निवड करायला आवडते. त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या बाबतीत निवड करू द्यात. जसं की 'तुला पिवळा टीशर्ट घालायचा आहे का निळा?' (म्हणजे गाडी नको त्या इतर कपड्यांकडे वळतच नाही.)

6. न आवडणार्‍या कामांत मज्जा कशी येईल ते बघा. 'टुथब्रश ची तलवार घेऊन चला तोंडातल्या जंतूंचा नायनाट करूयात.'

 

 

Tantrums 

At the end of second year and the beginning of the third year, is the time when babies develope likes and dislikes, also the time when feelings appear on their mental map. Also is the time when they want to perform various tasks. But obviously they can't do most of the things and many a times can't handle their own feelings, then there is a melt down. They cry loudly, start screaming, kicking, rolling on the ground, hitting parents. This can really get overwhelming for parents. They get flabbergasted by the transformation of their cute little baby.

If this happens outside home, in front of strangers, then it gets embarrassing as well. 

In such situations it's important for the parents to keep calm. If they become agitated then tantrum goes in higher octave and stubbornness creeps in. 

Always remember that all children go through this phase and embarrass their parents in public spaces. In such public displays, just pick up your child and leave. Removal from the situation or the thing which caused the tantrum helps. Then you can also distract the child. 

Always remember that tantrums occur because they cannot express themselves properly. There is a lag between their understanding and expression. So get down to their eye level and try to understand what they want and what are their feelings. Active listening is very important. When words fail them, they use gestures.

Are you hungry? Are you tired? Do you want something? Do you want to go out? etc. If you can't fulfil their wishes then explain in quiet, soothing voice. If for the fear of tantrums, you provide whatever the demands, you raise a spoiled stubborn brat.

Prevention is always better than cure. So let's see what we can do to avoid these tantrums. 

1. Please stick to their feeding and sleep routine. Hunger and tiredness can trigger a tantrum. Babies get comfortable with routine. 

2. This is an age of exploration. Rearrange your home in such a way that things within their reach are harmless. Taking away something from their hands can be a trigger. 

3. Don't use questions or negative sentences while giving them instructions. Instead of saying, 'don't bang the door. ' say 'please close the door quietly'. Instead of asking 'can you tidy up your toys?' Tell them 'tidy your toys as much as you can '.

4. If you are predicting a tantrum because of upcoming situation or a place you are going to visit, clearly state what to expect. 'We need to buy a gift for the neighbour's baby. So we are going to the toy shop. But today we won't be buying a new toy for you.'

5. Children love choices. Give them choices about routine small things. 'Do you want to wear blue t-shirt or the yellow one?' (Then they won't turn towards the unsuitable clothes.)

6. Make boring tasks fun. Let's bang bang all the germs in your mouth with this toothbrush gun.

 

Comments

Popular posts from this blog

Linguists भाषाकोविद

एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना Adopting a One-Year-Old Child

Active Learners धडपड, शिकाऊ उमेदवार