All the advice in the world will never help you until you help yourself
दत्तक विधान आणि त्याचे सामाजिक पैलू, या विषयावर मंथन होत असतांना एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आणि तो म्हणजे मूल दत्तक घेण्याच्या निर्णयावर आणि संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान एक सामाजिक दबाव असतो. नवदांपत्याच्या सभोवती असलेल्या नातलगांकडून तसेच इतर व्यक्तींकडून, नवविवाहित दांपत्याने मूल जन्माला घालावे अशी अपेक्षा व्यक्त होतेच आणि जसजशी विवाहानंतर वर्षे उलटू लागली की ही अपेक्षा अधिक धारदार बनू लागते.
पुरूषांपेक्षा महिलांना ह्या अपेक्षांचा दबाव जास्त अनुभवावा लागतो.
मीच कां? ह्या प्रश्नाचा उदय ह्या दबावातून येतो हे लक्षात घेतले पाहिजे. परंतू एकदा मीच कां? ह्या प्रश्नाचे स्वतःला समाधानकारक उत्तर मिळाले की पुढचा प्रवास सोयीचा होतो.
परंतु अनेक पालक या प्रश्नाचे उत्तर ठामपणे मानसिक पातळीवर स्वीकारू शकत नाहीत त्यामुळे मूल दत्तक घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतरही आणि कुटुंबात मूल आल्यानंतरही त्यांचा लढा सुरूच राहतो.
स्वतःचे जैविक मूल ( बायोलॉजिकल चाइल्ड)जन्माला न घालता येणाऱ्या पालकांना आपल्यात काही कमतरता आहे असंच आयुष्यभर वाटू शकतं.
जैविक मूल जन्माला न घालता येणे हा काही सामाजिक कलंक नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अनेकदा पालकांना दत्तक मूल कुठून आले त्याची जात कोणती? त्याचा धर्म कोणता असेल याची उत्सुकता असते. असे मूळ शोधण्याचा प्रयत्न पालकांकडून किंवा त्यांच्या नातलगांकडून सातत्याने केला जातो व प्रत्येक छोट्या गोष्टीचा संदर्भ मुलांच्या जन्माच्या इतिहासाशी जोडला जातो. मात्र जैविक पालकत्वात (Biological parents) अनुवंशिकतेवर कोणतेही नियंत्रण नसते त्यामुळे मूल जसे जन्माला येते तसे ते स्वीकारले जाते.
अनुवंशिकतेने आलेल्या अवगुणांचा स्वीकार त्यामुळे सहजतेने केला जातो.
परंतु दत्तक मुलांच्या संदर्भात असा स्वीकार करणे अवघड जाते. यामध्ये अधिक जबाबदारीचे वर्तन अपेक्षित असते ते मूल दत्तक घेणाऱ्या दांपत्त्यांनाच हा निर्णय घ्यायचा असतो की आपण महत्व कशाला देणार आहोत एक biological मूल आणि adoptive मुल वाढवण्यात काय फरक आहे असं वाटतं ?
या प्रश्नाची उत्तरे शोधत गेलो तर आपोआपच फरक काय आणि साम्य काय हे कळणार आहे कुठलेही बाळ वाढवत असताना त्या छोट्याश्या जीवाला कोणी मातीच्या गोळ्याची उपमा देतं तर कोणी छोट्या श्या रोपट्याची.
जसं मातीच्या गोळ्याला आकार देताना पहिल्यांदा त्या मूर्तीकाराला ठरवावे लागते मनोमन तयारी करावी लागते की मला याची प्रतिमा तयार करायची आहे ती कशी असणार आहे ती कशी सुंदर असेल, अनोखी unique असेल, ती करताना मूर्तिकार जर स्वतःच्या मतावर, स्वतःच्या कल्पनेवर विश्वास ठेऊन सकारात्मक पणे ते शिल्प घडवतो तर ते शिल्प सर्वांगाने सुंदरच होणार आहे.
एखादे रोपटे लावताना त्याची माती जी वापरणार तिचा कस कसा चांगला आहे तो कसा वाढवता येईल, रोज आवश्यक ते ऊन पाणी वारा सगळ्यांची सांगड बरोबर आहे ना हे जर पाहिले, एकदा प्रयत्न करून बघा पाणी घालताना सुद्धा तुम्ही गाणं गुणगुणत प्रसन्न भावनेने ते काम केले तर ते रोपटे पण तुमच्याशी संवाद साधताना जाणवते.
इथे प्रश्न तर छोट्या बाळाचा आहे तुम्ही जेवढ्या मायेने, प्रेमाने , विश्वासाने आणि सगळ्यांत महत्वाचे सकारात्मक ऊर्जेने देणार त्याच ऊर्जेने त्या बाळाची वाढ होणार
मग मुल हे बायोलॉजिकल असू दे नाहीतर अडॉप्टिव्ह असू दे फरक तो काय तुम्ही काय देताय, तुम्ही काय पेरताय, तुम्ही काय शिल्प साकारायचं विचार करताय हाच आहे.
आधी स्वतः वर काम केले, स्वतः विचारांनी मजबूत असाल तर हे पालकत्व प्रामाणिक पणे स्वीकारणे आणि ते प्रामाणिक पणे निभावणे हा प्रवास सुखकर जाणार आहे परंतू वास्तव न लपवता अगदी जवळच्याच व्यक्तींची मदत घेऊन मुलांना दत्तक असल्याबद्दलचे भान देणे व त्यांची संपूर्ण मानसिक तयारी करणे हाच सुजाण
पालकत्वाचा आधार ठरतो हे नक्की.
All the advice in the world will never help you until you help yourself
English
While deliberating on the topic of adoption laws and their social aspects, one point emerged prominently—the social pressure surrounding the decision to adopt a child and the entire process.
Newlywed couples often face expectations from relatives and others around them to have a biological child.
As years go by after marriage, these expectations become sharper.
Women, in particular, experience greater pressure compared to men.
The question, "Why me?" often arises from this pressure.
Understanding and addressing this question internally can ease the journey.
However, many prospective parents struggle to fully accept the answer on a mental level. As a result, even after deciding to adopt a child and welcoming the child into their family, their inner conflict persists.
Parents unable to conceive biologically may carry a lifelong sense of inadequacy.
It is essential to recognize that infertility is not a social stigma.
Many times, parents or their relatives are curious about the adopted child’s origin, caste, or religion.
Attempts to trace the child's background are often made, and small incidents are linked to the child’s birth history.
However, in biological parenthood, there is no control over heredity, and the child is naturally accepted as they are.
Flaws stemming from genetics are accepted with ease. In the case of adoption, such acceptance becomes challenging.
This requires greater responsibility and understanding, especially from adoptive parents.
The question arises—what is the difference between raising a biological child and an adoptive child? Exploring the answers reveals both similarities and differences.
Raising a child is often compared to shaping a lump of clay or nurturing a sapling.
A sculptor, before shaping clay, mentally visualizes the image they want to create.
If the sculptor works positively, believing in their vision, the sculpture turns out beautifully.
Similarly, when planting a sapling, one ensures that the soil is fertile, provides adequate sunlight, water, and air, and nurtures it with care and even joy—perhaps humming a tune while watering it.
This nurturing is reflected in the sapling's growth.
Here, the focus is on the child.
The love, care, faith, and, most importantly, the positive energy you provide determine the child’s growth.
Whether biological or adopted, the difference lies only in perception.
What matters is what you give, what you sow, and how you shape the child.
If parents first work on themselves, strengthen their thoughts, and approach parenthood sincerely, the journey becomes smoother.
Accepting parenthood honestly and openly, preparing the child mentally about their adoption with the help of close ones, and being truthful is the foundation of responsible parenthood.
All the advice in the world will never help you until you help yourself
Comments
Post a Comment