Who am I? कोहम् ?

 

कोहम् ?

 

मी कोण आहे? हा एक मोठाच गहन प्रश्न आहे. मोठ्मोठ्या तत्ववेत्त्यांनी ह्याचा शोध घेतला आहे. पण ह्या प्रश्नाचे उत्तर माणूस अगदी जन्मापासून शोधत असतो.

या शोधाचा (वाढीचा) पहिला टप्पा, जन्मापासून अठरा महिन्यांपर्यंतः 

हा सुरवातीचा शोध बराचसा शारीरिक असतो. बाळाला शोध लागत असतो आपल्याच हातांचा, पायांचा. मधेच आपल्याच चेहऱ्याला बोचकारून कुठे काय आहे, ते चाचपणे सुरू असते.

 ह्याच काळात एक प्रकारे मनोसामाजिक (psychosocial) वाढ पण होत असते. आपली भूक भागवणारी ही आजूबाजूची माणसं, 'आपली' माणसं आहेत. बोळकं पसरून बाळ हसतं.

 वयाच्या या टप्प्यात जगाबद्दल भरवसा (trust) तयार होत असतो. तो 'आशा' ही महत्त्वाची भावना तयार करतो.

 दुसरा टप्पा असतो अठरा ते तीस महिन्यांपर्यंतः त्यांना स्वतःच्या "मी" पणाची, आपल्याला आवडीनिवडी, भावना असण्याची जाणीव होते.

 ह्या टप्प्याला मराठीत 'तिसरं निसरं' तर इंग्रजीत 'टेरिबल टूज' म्हणतात.

 मुलांना पाय फुटलेले असतात आणि वेगवेगळी 'कामं' करायची असतात. अर्थात ती जमतातच असं नाही. मग येतो 'त्रागा' (tantrums). आणि हा त्रागा आईबाबांना चांगलाच दमवतो. पण लक्षात घ्या की ती शेवटी चिमुकली बाळं आहेत. त्यांचं लक्ष चटकन दुसरीकडे वळवता येतं.

मात्र भान ठेवायचंय की त्यांचे सर्व हट्ट पुरवायचे नसतात. त्यांना जी कामं जमतात त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. (जसे की आपले आपण बूट घालणे.) ह्या टप्प्यात इच्छाशक्ती (will) तयार होते. बालपणीचा तिसरा टप्पा साधारण तीन ते पाच वर्षांपर्यंत चालतो.

या वयात आपल्या घराबाहेरील इतर लोकांची, मुलांची ओळख होते. त्यांच्या बरोबर खेळणे, त्या खेळात पुढाकार घेणे सुरू होते. आधीचा आत्मकेंद्रिपणा कमी होऊन इतरांबरोबर जुळवून घेण्याची सुरुवात होते. ह्यातून 'निश्चय' (purpose) ही भावना वाढीस लागते. आपल्या पुढच्या ब्लॉग मधे आपण 'टेंपर टॅन्ट्रम' बद्दल सविस्तर बोलूयात.


Who am I?

This is a deeply philosophical question. Many a great philosophers have tried to find its answer.

But human beings start searching for the answer right from the first day of their lives. 

The first stage of this growth is from zero to eighteen months of life. Initially it is limited to discovery of body, my legs, my hands, my head. Babies then scratch their faces to discover what is there. 

Along with this there is psychosocial development. These other people around me, who take care of my hunger and other bodily needs are 'my' people. Babies acknowledge this by their toothless smile.

In this stage, babies’ develop trust about this world and the emotion of 'hope' takes root. 

The second stage is from eighteen to thirty months. (Generally referred as terrible twos.)

They discover their sense of 'self'. They realise that they have emotions and likes and dislikes. 

By now they can walk and want to explore their surroundings and want to try different activities. But of course they are not always successful. That brings on the 'tantrums'. These tantrums test the patience of the parents. But parents need to remember that they are still just babies and hence are easily distracted. (Parents should never give in to their fancies, otherwise they grow up as stubborn people.) Parents should encourage their small achievements (like putting on shoes). This stage develops 'will' in the child.

The third stage is preschool stage, from third to fifth year. By now their self-centeredness starts decreasing. They start discovering the world outside. Getting acquainted with other kids, playing with them and taking initiative for the play. These are the landmarks of this stage. 

'Purpose' is what develops at the end of this stage.

We will be talking in detail about temper tantrums in our next blog.

 

Comments

Popular posts from this blog

Linguists भाषाकोविद

एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना Adopting a One-Year-Old Child

Active Learners धडपड, शिकाऊ उमेदवार