Maria Montessori's children मारिया माॉन्टेसरीची मुले
मारिया माॉन्टेसरीची मुले
मारिया माॉन्टेसरीची मुले, अर्थात वय वर्षे दोन ते सात
या
टप्प्यात आपलं बाळ छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी झालेले असते. त्याला पाय फुटलेले
असतात. आणि खुर्ची किंवा लहान स्टूल सरकवून, त्याच्यावर चढून उचकपाचक करण्याची नवी कला
आलेली असते. आता घरच्या लोकांना घरातल्या वस्तूंची फेररचना करायला लागते. अजून एक
महत्त्वाचा बदल म्हणजे भाषेची उपलब्धी. जात्याच अंगात असलेले कुतूहल आणि उत्सुकता
आता प्रश्नांच्या स्वरूपात बाहेर येते. प्रत्येक गोष्टीत का? कशासाठी? अशा प्रश्नांनी समोरच्याला भंडावून सोडले
जाते.
अतिशय
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना प्रतिकात्मकता समजायला लागते. उदाहरणार्थ हात
पसरून विमान बनून घरभर आवाज काढत पळणारा मुलगा किंवा आपल्या भातुकलीच्या कपातून
बाबाला चहा पाजणारी मुलगी.
ह्याच
काळात मुले नकला पण खूप करतात. आजोबा कसे चालतात, आई कशी फोनवर बोलते वगैरे.
त्यांना
ह्या वयात चित्र काढायला पण खूप आवडतात. तुम्हाला ते चित्र समजलं नाही तरी
त्यांच्या डोक्यात काहीतरी जोरदार शिजत असतं. तुम्ही विचाराल तर ते खूप तपशीलात
समजावून सांगतात.
ह्या
वयातल्या मुलांची उत्सुकता कधी दाबून टाकू नये. त्यांच्या प्रश्नांना सोप्या
शब्दात, त्यांना समजेल अशा भाषेत उत्तरे द्यावीत.
त्यांच्याबरोबर
चित्रांची, गोष्टींची पुस्तके वाचणे, त्यांना चित्रांमधील वस्तू,
प्राणी, वाहने, फुले,
फळे वगैरे ओळखायला शिकवणे, असे उपक्रम करावेत.
चित्र
काढणे, चिकणमाती खेळणे, मणी ओवणे अश्या सोप्या कृती करायला
द्याव्यात. या पुढे जाऊन त्यांना बारीकशी मदत करू दिलीत तर मग काय आनंदच आनंद.
लहान
सहान कोडी सोडवायला द्यावीत. जसे की, कांदे बटाटे वेगळेवेगळे करायला द्या.
मोठ्या आकारापासून लहान आकारापर्यंत रिंग्ज किंवा ठोकळे रचायला द्या. चित्र
गिरवायला सांगा. (अजून ही स्क्रीन पासून लांबच ठेवा.)
त्यांच्या
डोक्यात एक विचारांचे भिरभिरे घुमत असते. त्यांना प्रश्न विचारून बोलते करा. ते
तुम्हाला अचंबित करतील.
एका
बाबतीत मात्र अजून अडचण असते. ते म्हणजे दुसरा माणूस आपल्यापेक्षा वेगळा विचार
करतो, हे त्यांना समजण्याच्या आवाक्याबाहेर असते. त्याच्याशी वाद घालणे फोल
असते. (त्यामुळे ही बरेचदा आत्मकेंद्री वाटतात.)
ह्या
सर्व वाढीस अनुसरूनच मारिया माॅन्टेसरी यांनी त्यांची शिक्षण पद्धती विकसित केली
होती
Maria Montessori's children
Maria Montessori's children
Age two to seven....
This is the next stage in the growth of our little
Columbus. By now the baby has become either a little boy or a little girl. Now
they are walking or running all over the house. They have acquired this new
skill of pushing a chair or a small stool, climbing on it and reaching things
kept on the higher shelves. Well! The family needs to be careful. Another big
change is acquisition of language skills. Their inner curiosity gets outlet.
They can now ask questions. Why? How? What for? Adults around get bogged down
by them.
Biggest achievement at this stage is they start
understanding symbols. A little boy will spread his hands like wings, become an
aeroplane and will run around the house making aeroplane noises. Or a little
girl will prepare make belief tea for her father in her toy teacup.
Kids also start imitating. How grandfather walks,
or how mother talks on her phone etc.
They love to draw. Adults might not understand what
they have drawn, but there is a lot going on in their heads. You have to just
nudge them, they would explain everything in detail.
Remember to never suppress their curiosity. Try to
answer their questions in as simple and easily understandable language as
possible.
Looking at books, pictures, stories, nursery rhymes
with them. Helping them recognise animals, fruits, vehicles, vegetables etc
from the pictures are some of the things that can help their growth.
Drawing, playing with clay, stringing beads, allow
and encourage them to do such simple tasks. Furthermore if you take their help
for small chores around the house, it will be a joyous occasion.
Ask them to solve simple puzzles. For example
separating onions and potatoes, arranging rings or blocks from smaller to
bigger size. Give them to stress pictures. (Screen should be further away.)
This is a stage where they start thinking, though
their thoughts are not logical. Ask them open ended questions and they will
amaze you with their answers. Biggest difficulty is that they simply don't
understand that other people can have different thoughts. So it's futile to
argue with them.
Maria Montessori developed her education system
while taking in consideration all these possibilities.
Comments
Post a Comment