MANTHAN

 मंथन म्हणजे नेमके काय? 

शास्त्रीय परिभाषेत  "अभ्यासातून, विचार प्रक्रियेतून जे प्रतिबिंबित होते, ते मंथन". 

बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयाबरोबरच मंथन अपरिहार्यपणे आलेच. असंख्य विचार, अनेक शंका कुशंकांची जळमटं आणि अपरिमित मानसिक आंदोलनं असतात डोक्यात. कधी कधी वाट हरवल्यागत वाटतं! ही वाट शोधण्याची, शंकांचं समाधानकारक निराकरण करण्याची आणि मानसिक आंदोलनं शांत करण्याची गतिविधी म्हणजेच मंथन!

साकार संस्था गेली तीन दशके दत्तकपूर्व आणि दत्तक पालकांबरोबर काम करते आहे. या संपूर्ण प्रवासात झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीचा खूप सारा अनुभव गाठीस बांधून हा मंथनचा उपक्रम सुरू करत आहोत. 

गेल्या काही वर्षांत दत्तक क्षेत्रात, सामाजिक, मानसिक स्तरावर तसेच दत्तक प्रक्रियेत प्रचंड बदल झाले आहेत, खूप मोठी उलथापालथ झाली आहे. पूर्वी पालकांबरोबर प्रत्यक्ष मुलाखतीतून, तसेच सखोल चर्चा व समुपदेशन सत्रांद्वारे परस्पर संवाद अनिवार्यपणे होत असे. आता मात्र दत्तक प्रक्रियेचे स्वरूप आमूलाग्र बदलल्यामुळे हे संभव होत नाही. 

म्हणूनच ON LINE प्रणालीद्वारे तुम्हा सर्वांशी थेट संवाद साधणे हाच मंथन प्रकल्पाचा उद्देश आहे. 

या संपूर्ण उपक्रमात साकारच्या तज्ञ व्यक्तींबरोबरच तुम्हा सर्वांचाच सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. 

आपल्या सगळ्यांच्याच उलट सुलट विचारांच्या घुसळणीतून अनावश्यक ते काढून टाकायचे आणि जे महत्त्वाचे व आवश्यक असेल त्याचा खुल्या मनाने स्वीकार करायचा आहे, रचनात्मक विचार व पालकत्वाची कौशल्ये यांचा विकास करायचा आहे. 

चला तर मग या परस्पर संवादाचा आरंभ करू या!!



What exactly is Manthan? 

In a scientific context, "what reflects through study and thought processes is Manthan." With the decision to adopt a child, Manthan inevitably follows. 

The mind is filled with countless thoughts, numerous doubts, and endless mental conflicts. Sometimes it feels like being lost! This activity of finding one’s way, resolving doubts satisfactorily, and calming mental conflicts is what Manthan is all about!

For the past three decades, SAKAR has been working with pre-adoptive and adoptive parents. Carrying the wealth of experience gained through all these years of intellectual exchange, we are starting this Manthan initiative.

In recent years, there have been massive changes in the field of adoption, at social and psychological levels, as well as in the adoption process itself. Earlier, there used to be direct communication with parents through personal interviews, in-depth discussions, and counseling sessions. However, due to the fundamental changes in the structure of the adoption process, this is no longer possible. 

Therefore, the purpose of the Manthan project is to establish direct communication with all of you through an online system.

Throughout this initiative, active participation from all of you, along with the experts at SAKAR, is expected. Together, through an exchange of diverse ideas, we will remove what is unnecessary, accept openly what is important and essential, and work to develop constructive thinking and parenting skills.

So, let’s begin this mutual dialogue!

Comments

Popular posts from this blog

Linguists भाषाकोविद

एक वर्षाचे मूल दत्तक घेतांना Adopting a One-Year-Old Child

Active Learners धडपड, शिकाऊ उमेदवार