Patience संयम
संयम
नव्याने आई झालेल्या आपल्या मुलीला तिची आई, बाळाची आजी, सल्ला देते, "अग, बाळाने दूध मागितल्यावर त्याला लगेच तोंडात बाटली देऊ नकोस. तापू देत थोडी भूक. म्हणजे मग तोंडाला बाटली लावली की तो पटपट दूध पिईल. उगाच इकडेतिकडे बघत बाटलीशी खेळत बसणार नाही."
असा सल्ला देणाऱ्या जुन्या आईकडे असतं, पिढ्यानपिढ्यांचे शहाणपण. ह्या तिच्या साध्याच, सोय बघण्याच्या कृत्याने बाळाच्या डोक्यातल्या कोर्या पाटीवर एक फार महत्त्वाची नोंद होत असते.
आईच्या ह्या साध्याच वागण्याने बाळ एक मोठाच गुण शिकत असतो. तो म्हणजे संयम किंवा पेशन्स.
'संयम', इतका अवघड गुण एक वर्षा खालच्या बाळाला शिकवायचा?!!!
या वयात बाळ पहिल्यांदा फक्त दूध पित असतं, झोपत असतं आणि शि-शू करत असतं. पुढे जाऊन हातपाय हलवायला लागतं, पालथं पडतं, पुढे सरकतं, रांगतं, धरून उभं राहातं वगैरे वगैरे. पण गेल्या ब्लॉग मधे बघितल्याप्रमाणे या वेळेस शारीरिक वाढीबरोबरच भावनिक वाढ पण होत असते.
पहिली भावना कळते ती मायेची, सुरक्षिततेची. बाळाला आईच्या मायेची खात्री पटल्यावर, आपल्याला भूक लागल्यावर ती दूध देणार आहे, याचा भरवसा निर्माण झाल्यानंतर मग ही पुढची पायरी चढायची असते.
बाळाला भूक लागली की ते आईला शोधतं, आरडाओरड करतं, रांगत जाऊन तिच्या पायाला पकडून आठवण करून देतं, की माझी भुकेची वेळ झालीय. आईला लक्षात असतंच की. पण अशा वेळेस बाटली आधीच तयार ठेवून लग्गेच तोंडाला लावणे करू नये.
बाळाकडे वळून त्याला सांगावं की, 'हो रे माझ्या सोन्या, मी तुझ्याच दूदू ची सोय करतेय. ही बघ बाटली.' जरी बाळाला शब्दशः अर्थ कळला नाही, तरी आईचा आश्वस्त सूर नक्कीच कळतो. अर्थात त्याच्या भुकेचा आगडोंब होऊन तो कळवळून भोकाड फोडेस्तोवर ताणायचं नक्कीच नाही.
पण हे इतक्या चिमुकल्या बाळाबरोबर करणं का आवश्यक आहे? नंतर नाही का करता येणार? तर हो येईल की. पण तेव्हा दुप्पट काम करावे लागेल. मला मागताच सर्व ताबडतोब मिळतं, ही जी हट्टीपणाची जोडणी मेंदूत तयार झालेली असते, ती आधी तोडावी लागते. मगच संयमाची जोडणी करता येते. बाळाच्या कोर्या मेंदूत ही जोडणी सोपी जाते.
बरेचदा तर मागितले ते लगेच मिळाल्यामुळे, मुलाचा स्वभाव हळूहळू हट्टी होत जातो. आणि मग पालकांना एकतर वाटतं की मूल मूलतःच हट्टी आहे, किंवा आता त्याला मानस तज्ज्ञांकडून सुधारून घ्यायला हवंय.पण लक्षात घ्या की मुलं आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडून अखंड शिकत असतं. तुम्ही त्याला काय शिकवता आहात? जाणीवपूर्वक लक्ष द्या.
बाळ नैसर्गिक रीत्या झालेले असो अथवा दत्तक, जर एक दिवस त्याला स्वतंत्र व्यक्ती म्हणून उभे करायचेय तर वेळीच वळण लावायला हवं.
'शुभस्य शीघ्रम्'.....
Patience
The mother, who has recently become a mother herself, receives advice from her own mother, the baby’s grandmother: "Don’t immediately give the baby the bottle when they ask for milk. Let them feel a little hunger first. That way, when you give the bottle, they’ll drink it quickly without fussing around or playing with it."
This advice from an experienced mother carries generations of wisdom. Through this simple act of preparing for the baby’s need, a very important lesson is being imprinted on the baby’s mind.
By the mother’s actions, the baby learns a big virtue: patience.
Patience—such a difficult quality to teach a baby under one year old?! At this age, a baby mostly drinks milk, sleeps, and poops. Later, as they grow, they begin to move their hands and feet, roll over, crawl, and eventually stand up. But as mentioned in the previous blog, during this period, along with physical growth, emotional development also takes place.
The first emotion the baby understands is love and security. Once the baby is assured of the mother’s love and knows that whenever they feel hungry, the mother will provide milk, they take the next step in their growth.
When a baby gets hungry, they search for their mother, cry, crawl to her, and remind her that it’s time for food. The mother is already aware of this, but during such times, she should not immediately offer the bottle that’s prepared.
She should turn to the baby and reassure them, saying, "Yes, my dear, I’m preparing your milk. Here’s the bottle." Even though the baby doesn’t understand the words exactly, the reassuring tone is understood. Of course, the baby should not be made to wait too long until they’re desperately crying for milk.
But why is this necessary with such a small baby? Can’t it be done later? Yes, it can, but it would take double the effort then. If everything is provided immediately upon request, the brain starts associating that instant gratification with entitlement. This attachment to getting what they want immediately needs to be broken first, and then patience can be taught. This connection is easier to form in the baby’s developing mind.
Many times, because the child gets what they want immediately, their nature gradually becomes stubborn. Parents then feel that the child is inherently stubborn or needs professional help from a psychologist. But remember, children are constantly learning from the world around them. What are you teaching them? Pay attention consciously.
Whether the child is biological or adopted, if you want them to grow into an independent person one day, they need to be shaped early.
Comments
Post a Comment